Archive Pages Design$type=blogging

११ महिन्यांत फक्त ५२% महसूल वसूल गौण खनिज विभागाकडे मनुष्यबळाचा तुटवडा

नगर - मागील अकरा महिन्यांपासून थंड बासनात गुंडाळ्यात आलेली महसूल वसुली गेल्या दहा दिवसांपासून पुन्हा जोमाने सुरू झाली अाहे. महसूल विभागान...


नगर - मागील अकरा महिन्यांपासून थंड बासनात गुंडाळ्यात आलेली महसूल वसुली गेल्या दहा दिवसांपासून पुन्हा जोमाने सुरू झाली अाहे. महसूल विभागाने वाळूचोरी, खनिजचोरी, तसेच वाळू लिलावातून गेल्या अकरा महिन्यांत फक्त ५२.८७ टक्के महसूल वसूल केला असून, येत्या ४० दिवसांत ठरवून दिलेल्या उद्दिष्टापैकी तब्बल ४२ कोटी ३७ लाख हजार ५४३ रुपयांचा महसूल वसूल करावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच गौण खनिज विभागाकडे मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने महसूल वसुलीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 

राज्य सरकारने यंदा गौण खनिज विभागाला ८९ कोटी ९० लाख ७९ हजार रुपयांच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. अवैध वाळूउपसा, खनिज उपसा, मुरूम उपसा, तसेच लिलावातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. जानेवारीअखेर गौण खनिज विभागाने ४७ कोटी ५३ लाख ७१ हजार ४५७ रुपयांचा महसूल वसूल केला आहे. उर्वरित महसूल येत्या ३१ मार्चअखेरपर्यंत वसूल करायचा आहे. ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपैकी वर्षभरात केवळ ५२.८७ टक्के महसूल वसूल करण्यात आला आहे. येत्या ४० दिवसांत ४२ कोटी ३७ लाख हजार ५४३ रुपयांचा महसूल वसूल करायचा आहे. आतापर्यंत सर्वाधिक ८६.९१ टक्के महसूल संगमनेर तालुक्यातून वसूल झाला असून, त्याखालोखाल नगर तालुक्यातून ७३.५५ टक्के महसूल वसूल करण्यात आला आहे. नेवासे ४७.०३, पाथर्डी २९.२२, शेवगाव १७.६८, श्रीगोंदे १५.५४, पारनेर ३०.३२, अकोले ४०.३९, कोपरगाव ४३.६९, राहाता ४४.७८, श्रीरामपूर ३०.८४, राहुरी ५४.४७, कर्जत ३७.३६ जामखेड तालुक्यात २७.७१ टक्के महसूल वसूल झाला आहे. गेल्या अकरा महिन्यांत महसूल विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या गौण खनिज विभागाने ४७ कोटी ५३ लाख ७१ हजार ४५७ महसूल वसूल केला आहे. आता उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू असून, तहसील कार्यालयांना वसुली पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासकीय पातळीवरून देण्यात आले आहेत. २०१५ -१६ या वर्षासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यांना उद्दिष्ट ठरवून दिले आहे. नगर तालुक्यासाठी १० कोटी, नेवासे कोटी ५० लाख, पाथर्डी कोटी ५० लाख, शेवगाव कोटी, श्रीगोंदे कोटी, पारनेर कोटी, संगमनेर १३ कोटी, अकोले कोटी, कोपरगाव कोटी, राहाता कोटी, श्रीरामपूर कोटी, राहुरी कोटी, कर्जत कोटी ९५ लाख जामखेडसाठी कोटी ९५ लाख असे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गौण खनिज विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा कोट्यवधींच्या महसूल वसुलीचे गौण खनिज विभागाला उद्दिष्ट देण्यात आले असले, तरी या महसूल वसुलीसाठी गौण खनिज विभागाकडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. या कार्यालयात एक गौण खनिकर्म अधिकारी, एक निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक
असा कर्मचारी वर्ग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या चार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हे कार्यालय चालते. मार्चअखेरसाठी अवघे ४० दिवस शिल्लक असताना अजून ४९ टक्के महसूल वसूल करणे बाकी आहे. 
उद्दिष्ट पूर्ण करणारच - तहसीलकार्यालयांना वसुली पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आतापर्यंत ५२ टक्के महसूल वसूल करण्यात आला आहे. मार्च अखेरपर्यंत ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल.'' संजय ब्राह्मणे, गौणखनिकर्म अधिकारी.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: ११ महिन्यांत फक्त ५२% महसूल वसूल गौण खनिज विभागाकडे मनुष्यबळाचा तुटवडा
११ महिन्यांत फक्त ५२% महसूल वसूल गौण खनिज विभागाकडे मनुष्यबळाचा तुटवडा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s320/04.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s72-c/04.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_834.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_834.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago