नवी दिल्ली - जनतेच्या सर्वोच्च आशा-आकांक्षाचे प्रतिबिंब उमटत असलेली संसद ही कामकाजाचा खोळ्या आणि गोंधळ घालण्यासाठी नाही, या शब्दांत राष्...
नवी दिल्ली - जनतेच्या सर्वोच्च आशा-आकांक्षाचे प्रतिबिंब उमटत असलेली संसद ही कामकाजाचा खोळ्या आणि गोंधळ घालण्यासाठी नाही, या शब्दांत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी खासदारांचे कान उपटले. सर्व खासदारांनी आपली जबाबदारी निभावतांना सहकार्य आणि सामंजस्य राखावे, असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला.
संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना त्यांनी येत्या आर्थिक वर्षातील सरकारचा अजेंडा मांडला. संसदेचे कामकाज सुरळीत सुरु ठेवण्यासाठी सरकार सातत्याने काम करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. देशाचा विकास आणि भरभराटीसाठी सामूहिकरित्या प्रयत्न करुया, असेही ते म्हणाले. विविध मुद्यांवर संसदेच्या कामकाजाचा वारंवार होणारा खोळंबा आणि वेळेचा अपव्यय तसेच राज्यसभेत स रकारकडे बहुमताचा अभाव असल्यामुळे रखडलेली विधेयके पाहता राष्ट्रपतीच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. आपल्या 20 पानी भाषणात राष्ट्रपतीनी सरकारची उपलब्धी आणि नव्या घोषणांचा उल्लेख केला. सर्व खासदारांनी शांतपणे त्यांचे भाषण ऐकले, पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सीमेपलीकडील दहशतवादी कारवाया निपटून काढण्यासाठी ठोस पावले उचलणार असल्याचे सांगत त्यांनी पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. पठाणकोटच्या हल्ला निष्फळ ठरविल्याबद्दल मी सुरक्षादलाचे अभिनंदन करतो. पाकिस्तानासोबत परस्पर सहकार्य आणि आदराचे संबंध ठेवण्यास भारत कटिबध्द आहे, असे ते म्हणाले.
सरकार भ्रष्टाचाऱ्यांची गय करणार नाही, असे सांगतानाच राष्ट्रपतींनी भ्रष्टाचाराला वाव न देण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे नमूद करुन ते म्हणाले. भ्रष्टाचाराला कोणाताही थारा न देताना सरकारने दोषींना शिक्षा ठोठावण्यासाठी संबंधित कायद्यातील त्रुटी भरुन काढल्या आहेत.










