अहमदनगर - 14 व 17 वर्षातील मुले व मुलीच्या राज्य अजिंक्यपद पिकलबॉल स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्याच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सांघिक विज...
अहमदनगर - 14 व 17 वर्षातील मुले व मुलीच्या राज्य अजिंक्यपद पिकलबॉल स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्याच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सांघिक विजेतेपद पटकाविले. तर उपविजेतेपद पुणे जिल्ह्याला मिळाले. विजयी संघांना शहीद विठ्ठल भालसिंग चषक इंद्रायणी भालसिंग यांच्या हस्ते देण्यात आला.
राज्य स्पर्धेचा निकाल - 14 वर्षाआतील मुले- सिंगलः प्रथम क्रमांक- हर्षा तांबे (औरंगाबाद), व्दितीय क्रमांक- मयांक देवदत्त जोशी (पुणे), डबलः- प्रथम क्रमांक- तेजय गायकवाड, वैभव लोणे (औरंगाबाद), व्दितीय क्रमांक- कौशीक व शंख्या वर्मा (औरंगाबाद), तृतीय क्रमांक- ऋतविक संजय सुर्वे, रुचा संदीप गायकवाड (पुणे). 14 वर्षाआतील मुली- सिंगलः प्रथम क्रमांक - अदिती जगताप (औरंगाबाद), व्दितीय क्रमांक - मदुरा सुशिल दाते (पुणे), तृतीय क्रमांक - सई शरद बारगट (पुणे), डबल - प्रथम क्रमांक - आर्या यादव, संस्कृती कुलकर्णी (औरंगाबाद), व्दितीय क्रमांक - तृतीय क्रमांक - सेलवंम रोशनी अरुणकुमार, सिध्दी दादासाहेब पाटील, तृतीय क्रमांक -17 वर्षाआतील मुले - सिंगलः प्रथम क्रमांक - कृष्णा मंत्री (औरंगाबाद), व्दितीय क्रमांक - यश पवार (औरंगाबाद), तृतीय क्रमांक - सिध्देश्वर माळी (सोलापूर), डबलः- साहील खोत, पृथ्वीराज राजपुत (औरंगाबाद), व्दितीय क्रमांक - तेजस पाटील, पियुष बगाडीया (औरंगाबाद), मिक्स डबलः- प्रथम क्रमांक - अजय युवराज चौधरी, साक्षी अरुणकुमार भावसार (जळगांव), व्दितीय क्रमांक - अभिषेक सिताराम नरवडे, सिध्दी अजय आहीरकर (पुणे), तृतीय क्रमांक - अक्षय मशाले, सलिहा मकांदार (सोलापूर)17 वर्षाआतील मुली - सिंगलः- प्रथम क्रमांक - ऋतुजा कालिके (औरंगाबाद), व्दितीय क्रमांक - सेजल धिरज गांधी (अहमदनगर), तृतीय क्रमांक - राजनंदीनी शंकर बारकुल (पुणे), डबलः- प्रथम क्रमांक - इशिका मालोंद्रे, आदीमा आफळे (औरंगाबाद), व्दितीय क्रमांक - माधुरी अशोक विसपुते, पुजा रमेश कोल्हे (जळगांव).










