अहमदनगर - जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सद्यस्थितीत कांद्याच्या बाजारभावात अचानक झालेल्या मोठ्या घसरणीमुळे आर्थिक सं...
अहमदनगर - जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सद्यस्थितीत कांद्याच्या बाजारभावात अचानक झालेल्या मोठ्या घसरणीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. आझ रोजडी एकरी कांदा उत्पादन करण्यास किमान 40 ते 50 हजार रुपये इतका खर्च येत आहे व एकरी उत्पादन 8 ते 9 टनापर्यंत मिळते त्यास प्रति क्विटंल 600 ते 700 रु. बाजारभाव मिळाला तर झालेला उत्पादन खर्चही मिळत नाही. कृषि पंपाचे बिल, मुला-मुलींचे शिक्षण व लग्न कार्यासाठी पैसा कोठून आणणार व कुटुंब कसे चालवणार? शेवटचा पर्याय म्हणून बँका, पतसंस्था किंवा सावकाराकडून कर्ज काढलेले कर्ज परत करण्यासाठी कांद्यासारख्या नगदी पिकांवरच त्याला अवलंबून रहावे लागते परिणामी शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याने आता मराठवाड्यातील शेतकऱ्याप्रमाणेच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात शेतकऱ्याला देखील आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही.
तरी राज्य शासनाने याबाबत गांभीर्य़ाने दखल घेऊन लवकरात लवकर कांद्याच्या खर्चावर आधारीत किमान 20/- हमी भाव द्यावा व कृषि तंज्ञानी सुचविलेल्या शिफारशी तात्काळ लागु कराव्यात. तसेच कांदा पिकावरील कामस्वरुपीचे निर्यात धोरण ठरवावे तरच शेतकरी जगेल. शासनाच्या विरोधात शेतकरी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरुन तीव्र स्वरुपाचे आंदोलन करील व त्याची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यापासून होईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी असे निवेदन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने संतोष वाडेकर यांच्या सहीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.










