अहमदनगर - भिंगार येथे डिफेन्स लॅन्ड स.नं.100/2101 ही जागा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. सदर जागेत वीर शिव लिंगायत गवळी समाजाची स्मशानभु...
अहमदनगर - भिंगार येथे डिफेन्स लॅन्ड स.नं.100/2101 ही जागा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. सदर जागेत वीर शिव लिंगायत गवळी समाजाची स्मशानभुमी आहे, आरक्षीत आहे. सरकारी नियमाच्या कचाट्यात ही जमीन अडकलेली असल्याने तेथे आम्हांस पाहिजे तशी सुधारणा करु शकत नाही. त्या जागेची एन.ओ.सी. सदर्न कमांड, पुणे यांच्या ऑफिसमध्ये आहे.
तरी आपणांस नम्र विनंती की, सदरची जागा आम्हांस नुतनीकरण करण्यासाठी परवानगी द्यावी ही नम्र विनंती. सदर स्मशानभुमीस पॉल कंपाऊंड करावयाचे आहे व तीची डागडुजी करुन योग्य ती सुव्यवस्था करावयाची आहे. गैरसोयीमुळे येथील नागरीकांची कुचंबणा होत आहे. तरी आपण यापासून त्यांची मुक्तता करुन योग्य ती कार्यवाही होणेची विनंती. तशा प्रकारचे निर्देश अहमदनगर कॅन्टोनमेंटला (भिंगार) देण्यात यावे अशी समाजाच्या वतीने विनंती. यांनी केंद्रीय रासायनिक खते संवर्धन मंत्री हंसराज अहिर यांना पाठवलेल्या पत्रात आहे.










