वरिष्ठ पत्रकार, नंदकुमार सातपुते यांचे वडील वसंतराव रंगनाथ सातपुते यांचे आज दि.18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता कान्हूर पठार (...
वरिष्ठ पत्रकार, नंदकुमार सातपुते यांचे वडील वसंतराव रंगनाथ सातपुते यांचे आज दि.18
फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता कान्हूर पठार (पारनेर) येथे रहात्या घरी वृध्दापकाळाने निधन
झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 79 वर्षांचे होते.
कान्हूर पठार येथे ते बांगड्यांचे व्यापारी होते. सर्वस्तरीय समाजाशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.
त्यांचे मागे 1 मुलगा व तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. आज सायंकाळी 6 वा. कान्हूरपठार
येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार असून तेथील अमरधाम मध्ये अत्यंसंस्कार
करण्यात येणार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.










