नगर-महागाईच्या काळात रुग्णांना आरोग्यमेळा परवडत नाही. आज डॉक्टरांनी व्यावसायिक म्हणून सेवा न करता गोर-गरिब रुग्णांच्या सेवेतच खरा आनंद मा...
नगर-महागाईच्या काळात रुग्णांना आरोग्यमेळा परवडत नाही. आज डॉक्टरांनी व्यावसायिक म्हणून सेवा न करता गोर-गरिब रुग्णांच्या सेवेतच खरा आनंद मानावा असे प्रतिपादन संजय पाडळे यांनी केले.
तारकपूर येथील सिंधी कॉलनी येथे श्रीकृपा क्लिनिक चा शुभारंभ नुकताच झाला यावेळी पाडळे बोलत होते. ते पुढे म्हणाले डॉ.गव्हाणे यांनी या भागात केवळ गोर-गरिबांना परवडेल अशा अल्पदरात येथे रुग्णसेवा उपलब्ध केली हा त्यांचा मोठेपणा आहे. रुग्णसेवेत आनंदच मिळतो असे पाडळे यावेळी म्हणाले. डॉ.रमेश गव्हाणे यांनी आपण व्यवसाय म्हणून व्रत न स्विकारता सेवा-भावी वृत्तीने आरोग्यसेवेचा वारसा जोपासत आहे. कमी पैशात चांगली सेवा देण्याचा मानस आहे. असे डॉ.गव्हाणे म्हणाले.
या उद्घाटन सोहळ्यास या भागातील सामाजिक कार्यकर्ते किशोर कंत्रोड, छबुराव साळवे, उमेश कारजकर, कुमार बोचुघोळ, रमेश कारजकर, मयुर बोचुघोळ, सुराज साळवे आदि उपस्थित होते.










