एअरो मॉडलर्स असोसिएशन ऑफ इंडिया व एअरोक्लब ऑफ इंडिया, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने व गुजरात सरकारच्या सहकार्य़ाने गुजरातच्या असरेली ये...

एअरो मॉडलर्स असोसिएशन ऑफ इंडिया व एअरोक्लब ऑफ इंडिया, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने व गुजरात सरकारच्या सहकार्य़ाने गुजरातच्या असरेली येथील विमानतळावर दि.19 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2016 रोजी नॅशनल एअरी मॉडेलिंग कॉम्पीटीशनचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये रिमोट कंट्रोल विमानांपासून ते बलून, विमानातून जंपींग, विमाने, हेलीकॉप्टरसह पॅरामोटरींग इ. देशभरातील हवेत उडणारे सर्व प्रकारचे क्रीडा प्रकार खेळले जाणार आहेत व त्यासाठी देशभरातून सर्व स्तरातील खेळाडूंना निमंत्रीत करणेत आले आहे.
या स्पर्धेमध्ये पॅरामीटर (पॉवर पॅराग्लायडींग) क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणेसाठी हवेतील साहसासाठी महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्यादेवळाली प्रवरा येथील सुपूत्र कॅप्टन आप्पासाहेब ढुस यांना दिल्लीच्या एअरोक्लब ऑफ इंडिया कडून निमंत्रक मिळाले आहे. या स्पर्धेत सहभागी होणेसाठी ते त्यांच्या साहित्यासह आज रवाना झाले असून त्यांना या क्रीडा प्रकारात भाग घेतांना जमिनीवरील सर्व सहकार्यासाठी राहुरी फॅक्टरी येथील जेम्स पाळंदे हे सहकार्य करणार आहेत.
या स्पर्धेत महाराष्ट्राचे नांव उज्वल करणेसाठी कॅप्टन आप्पासाहेब ढुस यांना महाराष्ट्र विधानसभेचे निरोधीपक्ष नेते मा.नामदार राधाकृष्णजी विखे पाटील, श्रीरामपूर विधानसभेचे आमदार भाऊसाहेब कांबळे, राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी आमदार प्रसाद तनपुरे, देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, वांबोरी येथील सुभाष पाटील, राहुरीचे कारभारी डौले, साहेबराव तनपुरे, डॉ.आण्णासाहेब गागरे तसेच देवळाली प्रवरा नगरपिरषदेचे व देवळाली प्रवरा सोसायटीचे सर्व कर्मचारी व नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.









