भारतभरती या राष्ट्रसेवी संस्थेच्या अध्यक्षपदी मा.अशोकजी मवाळ यांची निवड करण्यात आली. दि.26 जानेवारीला हॉटेल संजोग लॉन्स येथे झालेल्या ...
भारतभरती या राष्ट्रसेवी संस्थेच्या अध्यक्षपदी मा.अशोकजी मवाळ यांची निवड करण्यात आली. दि.26 जानेवारीला हॉटेल संजोग लॉन्स येथे झालेल्या वार्षिक महामेळाव्यात मावळते अध्यक्ष कै.कै.शेट्टी अध्यक्षपदी सूत्रे मवाळ यांचेकडे सुपूर्त केली. समाजजीवनाचा 40 ते 45 वर्षाचा अनुभव असलेले मवाळ हे रोटरी क्लब ऑफ अहमदनगर व आर्किटेक्ट इंजीनिअर्स & सर्वेअर्स असो. चे माजी अध्यक्ष आहेत. तसेच सिताराम सारडा विद्यालय माजी विद्यार्थी संघाचे खजिनदार आहेत. पुढील कालावधीत भारतभारतीची ठोस जडणघडण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. सर्वथरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.










