नगर- श्री विश्वकर्मा त्वष्टा पांचाळ समाज, अ.नगर यांच्यावतीने सालाबादप्रमाणे श्री विश्वकर्मा जयंती उत्सव (वर्ष 40 वे) मोठ्या उत्साहाने स...
नगर- श्री विश्वकर्मा त्वष्टा पांचाळ समाज, अ.नगर यांच्यावतीने सालाबादप्रमाणे श्री विश्वकर्मा जयंती उत्सव (वर्ष 40 वे) मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त नगर शहरातील प्रमुख मार्गावरुन मिरवणुक काढण्यात आली. दिल्लीगेट-चितळेरोड-तेलीखुंट- कापडबाजार-घासगल्ली-कालिका माता मंदिर येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
या मिरवणुकीत उमाकांत भोकरे, महेश नाळके, समाधान भोकरे, लक्ष्मीकांत भोकरे, गणेश आत्रे, कालस पाथरकर, सुनिल नाळके, दामोदर नाळके, श्रीकांत भोकरे, रवी हामकर, गोविंद म्हाळणकर, ज्ञानेश्वर गुंजकर, मुरलीधर नाळके, आशिष नाळके, शांताराम भोकरे आदिसह समाज बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री विश्वकर्मा जयंती उत्सवानिमित्त धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.










