Archive Pages Design$type=blogging

राहुरी सूतगिरणीच्या मालमत्तेचा होणार लिलाव

ई-निविदा मागविण्यात आल्या असून त्याची मुदत २ मार्चपर्यंत आहे. एकशे पाच एकर जमिनीसह मशिनरीचाही लिलाव करण्यात येणार आहे. देणी देऊन रा...




ई-निविदा मागविण्यात आल्या असून त्याची मुदत २ मार्चपर्यंत आहे. एकशे पाच एकर जमिनीसह मशिनरीचाही लिलाव करण्यात येणार आहे. देणी देऊन राहिलेल्या रकमेचे काय करायचे हा निर्णय शासन घेईल.

जिल्हा उपनिबंधक अहमदनगर राहुरी : कोट्यवधी रूपयांची देणी थकित असल्याच्या कारणावरून गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेल्या राहुरी व मुळा सूतगिरणीच्या मालमत्तेचा लिलाव होणार आहे. जमीन विक्रीसाठी जिल्हा उपनिबंधकांनी ई-निविदा मागविल्या आहेत. परंतु ज्या शेतकर्‍यांनी सूतगिरण्यांसाठी जमिनी दिल्या होत्या तेही आता जमिनीची मागणी करत असल्याने पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. 

राहुरी व मुळा या दोन्ही सूतगिरण्या गेल्या दहा वर्षांपासून बंद आहेत. कामगारांचे थकित सुमारे १२ कोटी रूपये सुतगिरणीला देणे आहे. दोन्ही सुतगिरण्यांची मिळून १0५ एकर जमीन आता विक्रीसाठी काढण्याचा निर्णय झाला आहे. मुळा सुतगिरणी जमीन खरेदीसाठी दोन निविदा इमेलव्दारे आल्या आहेत. यापूर्वी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे यांनी पणन महामंडळाकडून जमीन समितीसाठी जमीन खरेदी करण्याची परवानगी घेतली आहे. तनपुरे कारखाना सुरू असताना तत्कालीन अध्यक्ष रामदास धुमाळ यांनी शैक्षणिक संकुलासाठी जमीन खरेदी करण्याची तयारी दाखविली होती. बारा कोटी रूपयांच्या देणीसाठी ७0 ते ८0 कोटी रूपयांची जमीन विक्री करण्यात येणार आहे. यासंदर्भात ज्या शेतक-यांनी सुतगिरणीसाठी जमीन दिली होती त्यांनी मूळ मालकाला जमिनी परत करण्याची मागणी केली आहे. सूतगिरणी सुरू व्हावी या मूळ हेतूसाठी जमीन देण्यात आली होती असे शेतक-यांचे म्हणणे आहे. कामगारांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करण्यात आले असे मुळा सुतगिरणी कामगार संघाचे अध्यक्ष नानासाहेब कदम यांनी सांगितले. 

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: राहुरी सूतगिरणीच्या मालमत्तेचा होणार लिलाव
राहुरी सूतगिरणीच्या मालमत्तेचा होणार लिलाव
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjjC8BzFHHdlEPD4cFv69XdlZNOrt2lE6bCzEQhgDfLcbudS7oyJ6fc87sehg-n3t6Oa80ut3CktHtGGluTtdfocpXWzoAfN54s57EGS7AZJDWmoTDZi-G4juXrUo8ZRJGW84hHv3M1MdYi/s1600/Rahuri+girani.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjjC8BzFHHdlEPD4cFv69XdlZNOrt2lE6bCzEQhgDfLcbudS7oyJ6fc87sehg-n3t6Oa80ut3CktHtGGluTtdfocpXWzoAfN54s57EGS7AZJDWmoTDZi-G4juXrUo8ZRJGW84hHv3M1MdYi/s72-c/Rahuri+girani.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_896.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_896.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago