नगर - 14 फेब्रुवारीचे नवीदिल्ली येथील पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन जैन समाजाला दिशा देणारे ठरणार असून, या अधिवेशनाच्या माध्यमातून सुसंस्कृत-स...
नगर - 14 फेब्रुवारीचे नवीदिल्ली येथील पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन जैन समाजाला दिशा देणारे ठरणार असून, या अधिवेशनाच्या माध्यमातून सुसंस्कृत-सुशिक्षित राष्ट्रप्रेमी जैन समाजाच्या संघटित शक्तीचे दर्शन देशाला घडणार असल्याचे सकल जैन समाजाने हे अधिवेशन यशस्वी होण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावण्याचे आवाहन ऑल इंडिया जैन मायनॉरिटी सेलचे निमंत्रक सुधीर मेहता यांनी केले आहे.
जैन समाजाला राष्ट्रीय पातळीवर अल्पसंख्यांक दर्जा, अर्थातच जैन धर्म म्हणून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर, ऑल इंडिया जैन मायनॉरिटी सेलचे काम राष्ट्रीय अध्यक्ष ललीत गांधी आणि संघटक सचिव संदिप भंडारी यांनी जैन समाजाला सर्वार्थाने सक्षम करण्यासाठी, अल्पसंख्यांक सेलच्या माध्यमातून काम सुरु केले. नवी दिल्ली येथे होणाऱ्या अधिवेशनास केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला, मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. जैन समाजाला प्रथम हक्क असणारा सर्वात उशीराने अल्पसंख्यांक दर्जा मिळाल्याने हा समाज सवलतींपासून अनेक वर्ष वंचित राहिला आहे. हा अनुशे, भरुन काढण्यासाठी नजमा हेपतुल्ला यांनी पुढाकार घ्यावा, अशी आग्रही मागणी अल्पसंख्यांक क्षेत्रात अनेक वर्षे कार्य कऱणारे सुधीर मेहता यांनी केली आहे.खा.दिलीप गांधी, खा.विजय दर्डा, खा.राजू शेट्टी यांच्यासह सर्व जैन खासदार,आमदार या अधिवेशनास उपस्थित राहणार असून जैन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुधीर मेहता (मो.9423793375) यांनी केले आहे.










