नगर - सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजकार्य करीत असलेले शिववरद प्रतिष्ठान चांगले काम करीत आहे. प्रतिष्ठानने आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्...
नगर - सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजकार्य करीत असलेले शिववरद प्रतिष्ठान चांगले काम करीत आहे. प्रतिष्ठानने आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. समाजजागृतीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. महिलांचा एकमेकांत संवाद व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हळद-कुंकू व वाण वाटप समारंभ आयोजित केला. स्त्री मनात आदरभाव, स्नेह, आपुलकी आणि संस्काराची जपवणूक व्हावी, यासाठी अशा कार्य़क्रमांची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन सौ.आशा किशोर डागवाले यांनी केले.
शिववरद प्रतिष्ठानच्या वतीने हळदी-कुंकू व वाणवाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आशाताई किशोर डागवाले, सविता डागवाले, भार्गवी डागवाले, प्रांजली डागवाले, अनुजा डागवाले, सोनाली डागवाले, सविता डागवाले, रिकिता गवळी, शिल्पा गवळी, नयना जगधने, संगीत लेंडकर, मंगल गाडळकर, मंजली लेंडकर, हिरा जाधव, चित्रा जाधव, मंदाताई जाधव, रत्ना मुसळे, पल्लवी जाधव, कल्याणी मुसळे, दरव्हेकर, गोरे, भिेंगारकर, गणगले, भरेकर, शइंदे, चवंडके, डफळ, आव्हाड आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यानिमित्त मराठी-हिंदी गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमास सर्व समाजातील महिला सहभागी झाल्या होत्या.










