नरेंद्र मोदी आर्मी, पारनेरचे तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून कलविले आहे की, अनेक दिवसांपा...
नरेंद्र मोदी आर्मी, पारनेरचे तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून कलविले आहे की, अनेक दिवसांपासून महिलांना चौथऱ्यावर प्रवेश याबाबत श्री शनैश्वर देवस्थान (शनि-शिंगणापूर) येथील शनि महात्म्य या ग्रंथात निसर्गनियमाप्रमाणे परंपरा चालत आलेली आहे. मग एखाद्या मुठभर महिलांच्या संघटनेने हि परंपरा मोडायची व शनिभक्तांमध्ये असंतोष निर्माण करुन परंपरेला वेठीस धरण्याचा भाग होवू शकतो. महिलांना चौथऱ्यावर प्रवेश दिल्याने समाजातील गोर गरीब, कष्टकरी आणि शेतकरी महिलांना रोजची रोजी रोटी व सन्मान मिळणार आहे का? फक्त हिंदू मंदिराबाबत हे धोरण का? स्त्री-पुरुषकलह माजवून परंपरेविरुध्द शासनाचा, पर्य़ायाने जनतेच्या पैशाचा, कायदा आणि सुव्यवस्थेचा खर्च वाढवू नये. आज श्री शनैश्वर देवस्थान (शनि-शिंगणापूर) ची अध्यक्षा महिला भगिनी आहे हाही एक स्त्री धर्माचा सन्मानच आहे. हा सुध्दा पुरुष अहंकाराचा भाग होवू शकत नाही असे वाटते.
क










