नगर- नोव्हेंबर-डिसेंबर 2015 मध्ये अखिल भारतीय गांधर्व महामंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या संगीत परिक्षांचा निकाल नुकताच लागला. यामध्ये शनीच...
नगर- नोव्हेंबर-डिसेंबर 2015 मध्ये अखिल भारतीय गांधर्व महामंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या संगीत परिक्षांचा निकाल नुकताच लागला. यामध्ये शनीचौक येथील शिवरंजन संगीतालयाने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.श्रीनिवास मकरंद माळवदकर याने प्रवेशिका पूर्ण, कु.जानव्ही ख्रिस्ती हीने मध्यमा प्रथम व हर्ष शैलेश भंडारी याने मध्यमा पू्र्ण परिक्षेत तबला हा विषय घेऊन केंद्रात सर्वप्रथम घेण्याचा मान मिळविला. या सर्व विद्यार्थ्यांना शिवरंजनचे संगीत शिक्षक लक्ष्मणराव डहाळे, प्रकाश शिंदे (शिंदे तबलेवाले) यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.चि.श्रीनिवास हा केंद्रीय विद्यालयात इ.6 वीमध्ये आहे तर कु.जानव्ही समर्थ विद्या मंदिर, सांगळे गल्ली विभागात इ. 8 वी मध्ये तर चि.हर्ष हा केंद्रिय विद्यालयात इ.10 मध्ये शकत आहे. या यशस्वी विद्यार्थ्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.










