अहमदनगर - आज बुधवार दि.10 रोजीपासून तमाम ख्रिस्ती समाजाच्या उपवास समयास प्रारंभ झाला आहे. हे उपवास 40 दिवसांचे असून गुडफ्रायडेच्या दिवशी ...
अहमदनगर - आज बुधवार दि.10 रोजीपासून तमाम ख्रिस्ती समाजाच्या उपवास समयास प्रारंभ झाला आहे. हे उपवास 40 दिवसांचे असून गुडफ्रायडेच्या दिवशी महाउपवास व महाविधीने सांगता होईल.
या संपुर्ण उपवास काळात प्रत्येक चर्चमध्ये दररोज विशेष विधींचे आयोजन केले जाते. विविध ज्ञानवंत व विचारवंत, तसेच धर्मगुरु उपस्थित असतांना धार्मिक व नैतिक जीवनमुल्यांविषयी मार्गदर्शन करीत असतात. अनेक ख्रिस्ती वसाहतींमध्ये सुध्दा सामुदायिक प्रार्थनांचे आयोजन केले जाते.
आजचा पहिला दिवस म्हणजे बुधवार. याच दिवसाला राखेचा बुधवार असे नामाभिधान वापरले जाते. राख ही वैराग्य, शोक, पावित्र्य याचे प्रतिक सर्वच समाजात वापरले जाते.










