नगर:- 10 वी च्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत घेतली आहे. शाळेतील शिक्षकांनीही जीव ओतून विद्यार्थ्यांना ज्ञानदान दिले आहे. त्...
नगर:- 10 वी च्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत घेतली आहे. शाळेतील शिक्षकांनीही जीव ओतून विद्यार्थ्यांना ज्ञानदान दिले आहे. त्यामुळे एस.एस.सी. परिक्षेला सामोरे जातांना विद्यार्थ्यांनी परमेश्वराचा आशिर्वाद घ्यावाच मात्र स्वत:च्या आत्मविश्वासाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी परिक्षेस बसावे. आयुष्यात इतरांशी स्पर्धा न करता स्वत:शी स्पर्धा केली तरच यश तुमच्या पदरात पडणार आहे. ज्या शाळेतील शिक्षकांनी तुम्हाला घडविले आहे, अशा गुरुजणांना कधीही विसरु नका. जीवनात किती मोठे झाले तरी शाळेशी संपर्क ठेवून कृतघ्न न राहता कृतज्ञ व्हा, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे सचिव सुनिल रामदासी यांनी केले.
बागडपट्टी येथील हिंद सेवा मंडळाच्या सिताराम सारडा विद्यालयातील 10 वी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व निरोप देण्याच्या कार्याक्रमात सुनिल रामदासी बोलत होते. शाळेच्या चेअरमन रोहिणी शिवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास शाळेचे माजी विद्यार्थी व आर्किटेक इंजिनइर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष संजय पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्या सौ.स्मिता तनवर, शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल भांगरे, पर्यवेक्षक विक्रम सोनवणे, शिक्षक प्रतिनिधी दिपाली लगड, विलास साठे, अशोक डोळसे, दिपक शिरसाठ, सुखदेव नागरे आदि उपस्थित होते.










