शहरातील बॅटरी व्यवसायिकांनी व्यवसाय करतांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संघटित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन येथील कोहिनूर बॅटरीजचे स...

शहरातील बॅटरी व्यवसायिकांनी व्यवसाय करतांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संघटित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन येथील कोहिनूर बॅटरीजचे संचालक तथा पत्रकार सय्यद अन्सार यांनी केले आहे.
नुकतेच हॉटेल सिंग रेसिडेन्सी येथे शहरातील बॅटरी व्यवसायिकांसाठी चर्चासत्र आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी सय्यद बोलत होते. सर्वांनाच नोकरी मिळणे अथवा मिळविणे शक्य होत नसल्यामुळे युवकवर्ग या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे. त्यामुळे या व्यवसायात स्पर्धा वाढत चालली असून याचा सर्वच बॅटरी व्यवसायिकांवर परिणाम होत आहे. यासाठीच बॅटरी व्यावसायिक एकत्रित येणे गरजेचे असल्याचे मत सय्यद यांनी मांडले.
ते पुढे असेही म्हणाले की, व्यवसायिकांनी स्पर्धेच्या युगात योग्य मोबदला घेऊनच व्यवसाय करावा. आपापसात व्यवसायिक स्पर्धा करु नये. सेवा शुल्क सर्वांनी एकसारखेच ठेवावे (अंतरानुसार). व्यवसायात पारदर्शकता ठेवून उत्कृष्ट सेवा द्यावी जेणेकरुन ग्राहकही आपल्या सेवेमुले संतुष्ट राहिल. या बैठकीला शहरातील बहुसंख्य बॅटरी व्यावसायिक उपस्थित होते.









