मतदारसंघनिहाय उमेदवार २१ संचालकांच्या जागा : आज चिन्ह वाटप होणार २१ संचालकांच्या जागा : आज चिन्ह वाटप होणार सर्वसाधारण मतदारसंघ -अ...
मतदारसंघनिहाय उमेदवार
२१ संचालकांच्या जागा : आज चिन्ह वाटप होणार
२१ संचालकांच्या जागा : आज चिन्ह वाटप होणार सर्वसाधारण मतदारसंघ -अकोले ३, संगमनेर ३, कोपरगाव ३, राहाता ३, श्रीरामपूर ३, श्रीगोंदा ५, कर्जत ३, जामखेड ४, पाथर्डी ५, शेवगाव ३, नगर ४, राहुरी ३, पारनेर ३ आणि नेवासा ५. नॉनटिचिंग ६, अनुसूचित जमाती ७, विभाजाभज ५, महिला ८, ओबीसी ३ यांचा समावेश आहे. मतदारसंघनिहाय उमेदवार
नगर (एलएसएस प्रतिनिधी) : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या २८ तारखेला होणार्या निवडणुकीसाठी २१ संचालकांच्या जागेसाठी ७९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी (सोमवारी) दाखल झालेल्या ६७५ उमेदवारी अर्जापैकी ५९५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यात काही अपक्ष उमेदवारांनी वैयक्तिक अर्जाव्दारे तर मंडळांनी सामुदायिकरित्या उमेदवारी अर्ज माघारीचे पत्र दिले. रिंगणातील उमेदवारांची संख्या निश्चित झाल्याने प्रचारातील रंगत वाढणार आहे.
शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारपासून प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. सत्ताधारी यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळाचा वचपा काढण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत. यंदाची निवडणूक तिरंगी होत असून गुरुमाउली वगळता अन्य सर्वच मंडळांनी युती-आघाडी केली आहे. गुरुकुल आणि गुरुमाउलीने एकाच दिवशी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवला असून सदिच्छा मंडळ मंगळवारचा मुहूर्त साधणार आहे. तिरंगी लढतीमुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. बँकेचा कारभार, सभासद हित आणि आतापर्यंत झालेला भ्रष्टाचार यावर ही निवडणूक गाजणार आहे. निवडणुकीसाठी गुरुकुल मंडळाने पणती, पेनाची निब, टेबल, गुरुमाउली मंडळाने मशाल, पणती आणि तुळस वंृदावन तर सदिच्छा मंडळाने शंख, नारळ आणि गुलाब या चिन्हांची मागणी केली आहे. गुरुकुल आणि गुरुमाउलीकडून सारख्या चिन्हांची मागणी झाल्याने ऐनवेळी निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. निवडणुकीतील ७ अपक्ष उमेदवारांनी एकत्र येवून मागणी केल्यास त्यांना मंडळाचा दर्जा देवून एक समान चिन्ह देता येईल, असे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी सांगितले. मंगळवारी सर्व मंडळातील अधिकृत उमेदवार आणि चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे.विकास मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून त्या ठिकाणी १७ जागांसाठी ५९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
अकोले आणि जामखेड तालुक्यात गुरुमंडळाचे पॅनल लंगडे झाले आहे. विकास मंडळातही गुरुकुल, सदिच्छा आणि गुरुमाउली मंडळात लढत होत आहे. विकास मंडळावर कब्जा मिळवण्याठी या तिन्ही मंडळात चुरस सुरू आहे.










