नगर- राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त इन्स्टीट्युट ऑफ इंजिनिअर्स अहमदनगर शाखेच्या वतीने स्व.अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कुलच्या ...
नगर- राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त इन्स्टीट्युट ऑफ इंजिनिअर्स अहमदनगर शाखेच्या वतीने स्व.अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कुलच्या सभागृहामध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अ.ए.सोसायटी हायस्कुलच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने व दिनप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी इन्स्टीट्युटचे अध्यक्ष अरविंद पारगांवकर, छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार देशपांडे, इन्स्टीट्युटचे मानदसचिव हरिचंद्र थिगळे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला थिगळे यांनी प्रदर्शनाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. या प्रदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, नेप्ती येथील विद्यार्थी विद्यार्थींनी विकसित केलेली वैज्ञानिक उपकरणे व प्रोजेट तसेच एल ऍण्ड टी संचलीत अगत्स्या र्फौंडेशनच्या फिरत्या वैज्ञानिक प्रयोग शाळेची सुमारे 50 हून अधिक उपकरणे सादर करण्यात आली आहे. हे प्रदर्शन शनिवार दि.27 व रविवार दि.28 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत इंग्लिश मेडियम स्कुलच्या सभागृहात सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आलेली आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी मानद सचिव हरिचंद्र थिगळे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमा प्रसंगी एल ऍण्ड टी कंपनीचे मानव संशाधन विभागाचे प्रमुख नागेशचंद्र आढाव, इंजिनइर अविनाश मांडे, राजकुमार मुनोत, प्रा.अहिरराव, किशोर डोंरगे, प्रा.शैलेंद्र गाढवे, डॉ.सारडा व विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे प्रदर्शन रविवार दि.28 फेब्रुवारी पर्यंत इंग्लिश मिडियम स्कुल सभागृहामध्ये सर्वांसाठी मोफत आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन इन्स्टीट्युट ऑफ इंजिनिअर्स या संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.









