अहमदनगर - नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाईचे येथील रहिवासी सलीम अकबर शेख यांनी, अंजूमन जमेतून कुरेश या जातपंचायत मार्फत आपल्या कुटुंबावर सा...

अहमदनगर - नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाईचे येथील रहिवासी सलीम अकबर शेख यांनी, अंजूमन जमेतून कुरेश या जातपंचायत मार्फत आपल्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार व त्रास देण्याबाबतची तक्रार एमआयडीसी, कोतवाली पोलीस स्टेशन, मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हा अधिकारी व पोलीस अधिक्षक यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
आपल्या तक्रारीवर योग्य कार्य़वाही न झाल्यास 2 मार्चपासून मा.जिल्हाधिकारी यांचे कार्यालयासमोर आपण बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहोत असे सदर पत्रात म्हटले आहे.
दरम्यान लाल निशान पक्षाचे कार्यकर्त्यांनीही सदर उपोषणास पाठिंबा देऊन उपोषणास बसण्याचे पत्रकात जाहीर केले आहे.
मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांना पाठविलेल्या पत्रावर लाल निशान पक्षाचे कॉ.अनंक लोखंडे यांचे स्वाक्षरी आहे.









