नगर - तालुक्यातील निमगांव वाघा येथील समाजसेवक पै.नाना डोंगरे यांना शेवगाव तालुक्यातील बुऱ्हाणपुर येथील गाथा पारायण संघटनेच्या वतीने...
नगर - तालुक्यातील निमगांव वाघा येथील समाजसेवक पै.नाना डोंगरे यांना शेवगाव तालुक्यातील बुऱ्हाणपुर येथील गाथा पारायण संघटनेच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम भुषण पुरस्कार नुकताच शेवगाव तालुका अ.भा.वारकरी मंडळाचे सचिव व कार्य़क्रमाचे आयोजक ह.भ.प. सुभाष महाराज दिवटे यांच्या शुभहस्ते देण्यात आला. यावेळी साळकर महाराज, प्रा.सुनिल मतकर, बापूसाहेब दिवटे, भाऊसाहेब खैरे, बाळासाहेब वाणी, मुख्याध्यापक शिपलकर, भरत मिसाळ आदिंसह विद्यार्थी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पै.नानासाहेब डोंगरे गेल्या 20 वर्षापासून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा, व्यसनमुक्ति, स्त्री जन्माचे स्वागत करा इ. क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य़ करीत आहे.









