नगर - केंद्र व राज्य शासन यांच्या सुचनेनुसार नगर शहरातील आठवड्याच्या दर गुरुवारी स्वच्छता मोहिम राबविण्यात यणार आहे. या मोहिमेच्...
नगर - केंद्र व राज्य शासन यांच्या सुचनेनुसार नगर शहरातील आठवड्याच्या दर गुरुवारी स्वच्छता मोहिम राबविण्यात यणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून परिसर स्वच्छता करण्यात येईल, तसेच नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जाईल.
अ.नगर महापालिका प्रभाग 30 मधील अ.नगर मनपाच्या वतीने यश पॅलेस ते चाणक्य चौकादरम्यान ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत आयुक्त विलास ढगे, स्थायीचे सभापती गणेश भोसले, उपायुक्त भालचंद्र बेहरे, डॉ.सतीश राजूरकर आदींसह कर्मचारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
यावेळी बोलताना भोसले म्हणाले की, दिवसेंदिवस नवनवीन आजारांचे प्रकार उदभवत असून, याला काही अंशी अस्वच्छताच जबाबदार आहे. डेंग्यू, चिकनगुणिया, मलेरिया आदींसारख्या आजारापासून मुक्ततेसाठी स्वच्छता गरजेची आहे. नागरिकांना उपक्रमाबद्दल माहिती देणे गरजेचे असते. ते मी करीत असल्यामुळे नागरिक या उपक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्य़क्रम यशस्वी होण्यास मदत होते, असे ते म्हणाले.










