नगर- एका सर्वसामान्य कुटूंबात जरी जन्म झाला असला तरी आई-वडील, शिक्षक, गुरुजनांच्या प्रेरणेने स्वत: मधे जिद्द, परिश्रमाला जोड देवुन ...
नगर- एका सर्वसामान्य कुटूंबात जरी जन्म झाला असला तरी आई-वडील, शिक्षक, गुरुजनांच्या प्रेरणेने स्वत: मधे जिद्द, परिश्रमाला जोड देवुन दक्षिण आशियाई क्रिडा स्पर्धेत मी जे सुवर्णपद मिळविले त्यासाठी माझ्या पाठीशी साई-बाबांचा आर्शिवादही होता. असे प्रतिपादन श्वेता गवळी हिने केले.
वसंत टेकडी येथील संदेशनगरमध्ये साई-बाबांच्या मंदिरात साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने श्वेता हिचा सन्मान करण्यात आला. यावेळी तीच्या हस्ते साईची आरती करण्यात आली. यावेळी ती बोलत होती. ती पुढे म्हणाली कुठल्याही क्षेत्रात यश हे सहजरित्या मिळत नसते त्यासाठी अंतरमनापासुन जिद्द आणि कठोर परिश्रमाची तयारी पाहिजे. पाऊलबुद्धे शाळेत शिक्षण घेताना तेथील शिक्षकांचा मला मिळालेला पाठींबा मोलाचा आहे. जिद्द, परिश्रमाबरेाबरच साईचा आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्याने मला यश मिळाले. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश जीवनात अनुभवला असल्याने श्वेता हिने यावेळी स्पष्ट केले.
ह.भ.प. श्रीकांत निसळ शास्त्री यांचे यावेळी प्रवचन झाले. बाबुशेठ चिपाडे, नवनाथ गवळी, डॉ.प्रकाश त्रिंबके यांचे हस्ते आरती होवून महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. प्रतिष्ठानचे सुनिल त्रिंबके, योगेश पिंपळे, विशाल जाधव, महेश टाक, बंटी कुडीया, दिनेश पालवे, बनकर सर यांनी विशेष परिश्रम घेतले.









