नगर - आनंद व दुःख जीवनात हे चढ उताराप्रमाणे असतात त्याप्रमाणे यश अपयश हे येतच राहणार, यशान हुरळून जाऊ नका आणि अपयशाने खचून जाऊ नका. ...
नगर - आनंद व दुःख जीवनात हे चढ उताराप्रमाणे असतात त्याप्रमाणे यश अपयश हे येतच राहणार, यशान हुरळून जाऊ नका आणि अपयशाने खचून जाऊ नका. मोठी स्वप्ने पाहा म्हणजे लहान स्वप्ने तरी पूर्ण होतील असे प्रतिपादन सुजित बेडेकर यांनी केले.
श्री.बेडेकर पुढे म्हणाले जीवन हे एक क्रिकेट मॅचसारखे आहे. या मॅचमध्ये पिचवर टिकून राहणे महत्वाचे आहे. 6 चेंडू पैकी 5 चेंडू जरी वाया गेले तरी 6 चेंडूवर असा टोला मारा कि 5 ही चेंडूची कसर भरुन निघाली पाहिजे. कोणत्याही अपयशावर आत्महत्या हा उपाय नाही असे बेडेकर म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात तहसिलदार मरकड यांनी विद्यार्थ्यांमध्ये 5 गुण आवश्यक आहे. ज्ञानाची तहान असणे, गुरुबद्दल निष्ठा, नियमित अभ्यास, एकाग्रता, महत्वाकांक्षा या गुणांमुळे इच्छाशक्ती वाढते. असे त्यांनी विद्यार्थ्यांचे मागदर्शन केले.
प्रारंभी विज्ञान, हस्तलिखित, चित्रकला, कार्य़ानुभव प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनातील कला-गुणांची पाहणी करण्यात आली. मुख्याध्यापिका कल्पना लवांदे यांनी प्रास्तविकात वार्षिक अहवाल वाचन करुन विद्यालयाची प्रगती, सेवाशिक्षण मंडळाच्या कार्य़ाची माहिती दिली. या समारंभात संस्थेचे देवदत्त पाऊलबुध्दे, दादासाहेब भोईटे, आर.डी.बुचकुल, रघुनाथ कारमपुरे, संजय पवार आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्या रेखाराणी खुराणा, सविता सानप, अनिता सिद्दम, संभार, नराल मॅडम यांनी परिश्रम घेतले.
सुत्रसंचालन विजया नवले, दिपक परदेशी यांनी केले तर विजयालक्ष्मी मंगलारम यांनी आभार मानले.










