भाजप प्रणित सरकारचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेमध्ये सन 2016-17 करिता देशाचा अर्थसंकल्प संसदेसमोर ठेवला. अर्थसंकल्प सादर क...
भाजप प्रणित सरकारचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेमध्ये सन 2016-17 करिता देशाचा अर्थसंकल्प संसदेसमोर ठेवला. अर्थसंकल्प सादर करण्याची जेटली यांची ही तिसरी वेळ आहे. नैसर्गिक आपत्तीने संकट निर्माण केले तरीही एनडीए सरकारच्या काळात महागाई कमी झाली आहे. आम्ही अडचणींचे रुपांतर संधीत केले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडूनही भारताचे कौतुक झाले आहे. विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सध्या महागाईचा दर 5.4 टक्के तर विकास दर 7.6 टक्के आहे असे सांगत जेटलीने अर्थसंकल्पातील तरतूदी सभागृहासमोर ठेवल्या.
* दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना गॅसपुरवठा, गरीब महिलांच्या नावे एल.पी.जी. कनेक्शन देणार, स्टँडअप योजनेमधून अनुसूचित जाती-जमातीच्या महिलांना मदत * शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर भर, शेतकऱ्यांना 9 लाख कोटींचे अतिरिक्त कर्ज, शेतीमालासाठी ई-मार्केटची उपलब्धता, शेतकऱ्यांच्या व्याजमाफीसाठी 15 हजार कोटींची तरतूद * सिंचन वाढविण्यासाठी विशेष प्राधान्य * 28.5 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी प्रय़त्न * शेतीसाठी 35 हजार 984 कोटींचा निधी * ऑरगॅनिक फार्मिंगला प्राधान्य, नॉर्थ-ईस्टमध्ये ऑरगॅनिक फार्मींग हब उभे करणार * पंतप्रधान सिंचन योजना 5 वर्षात पुर्ण करणार * नाबार्डच्या माध्यमातून 20 हजार कोटी उभे करणार * ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा वाढविणार, पायाभूत सुविधांसाठी 1.21 हजार कोटींची तरतूद * 23 नवे सिंचन प्रकल्प मार्गी लावणार * मनरेगा अंतर्गत 5 लाख तलाव मांडणार, मनरेगासाठी 38 हजार 500 कोटींची तरतूद * ए.पी.एम.सी. कायद्यात सुधारणा करणार, या कामी 12 राज्यांनी आधीच तयारी दर्शविले आहे * पंतप्रधान ग्रामसडक योजनेसाठी 196 कोटींची तरतूद * पीक विमा योजनेसाठी 5500 कोटींची तरतूद, खतांची सबसिडी थेट खात्यात जमा * डाळ उत्पादनासाठी 500 कोटींची तरतूद * गरीबीवर मात कऱण्यासाठी दिनदयाल अंत्योदय मिशन राबविणार * 2018 पर्यंत सर्व गावांना वीजपुरवठा * स्वच्छ भारत योजनेस ग्रामपंचायतींना 80 लाख 9 हजार कोटींची तरतूद, या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला 20 लाख रु. देणार * डिजिटल साक्षरतेसाठी नव्या योजना * रेन वॉटर हार्वेस्टींगसाठी 20 हजार कोटींची तरतूद * 30 हजार जेनरिक मेडिकल सुरु करणार, राष्ट्रीय डायलीसीस योजना राबवून त्यांच्या यंत्रावरील संपुर्ण कर माफ कऱणार * शिक्षणातून नोकरीची संधी निर्माण करणार, पंतप्रधान कौशन विकास योजनेत 100 केंद्रांची उभारणी, या योजनेसाठी 1 कोटीची तरतूद, सर्व शिक्षा अभियानांतर्गत 62 नवोदय विद्यालयाची उभारणी, जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यावर भर * नवीन कर्मचाऱ्यांना ईपीएफ अंतर्गत 8.5 टक्के लाभ देण्यासाठी 1 हजार कोटींची तरतूद, नवीन कर्मचाऱ्यांचा सुरवातीच्या 3 वर्षांचा भविष्य निर्वाह निधी सरकार भरणार * सर्व राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्गात बदलणार, रस्त्यांसाठी 55 हजार कोटी रु.ची तरतूद * देशातील 160 विमानतळांचा विकास * प्रवासी वाहतुकीसाठी खाजगीकरणाचा मार्ग पत्करणार, प्रवासी वाहतुकीतील परवानाराज संपुष्टात आणणार, मोटार व्हेईकल अॅक्टमध्ये बदल करणार * ई.पी.एफ.ओ.साठी सरकार देणार 10 हजार कोटी * न्युक्लिअर पॉवर जनरेशन करीता 3 हजार कोट * फुड प्रोसेसिंग उद्योगात 100 टक्के एफडीआय * सेबी कायद्यात सुधारणा करणार, चिट फंड कंपन्यांच्या फसवणुकीला आळा घालणार * 3 वर्षात सर्व पोस्ट ऑफीसमध्ये ए.टी.एम. बसविणार * येत्या अधिवेशनात आधार विधेयक आणणार * देशाला जोडण्यासाठी 'एक भारत- श्रेष्ठ भारत' योजना राबविणार * कंपनी अधिनियम कायद्यात बदल, स्टार्टअपमध्ये एका दिवसात कंपनीची नोंदणी * मुद्रा योजनेसाठी 1 लाख 80 हजार कोटी * सरकारी बँकांसाठी 25 हजार कोटींचा फंड, बँकांमधील सरकारी भागीदारी 50 टक्क्यांवर आणणार * वित्तीय तूट 3.6 टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न * 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 3000 रु. ची सूट * एच.आर.ए. (घरभाड्यातील तरतूद) मर्यादा 24 हजारावरुन 60 हजारापर्यंत वाढविणार * उत्पन्न कराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही * कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्यांना करसवलत * 5 कोटीपर्यंत उलाढाल असणाऱ्या उद्योजकांना करसवलत * परवडणारी घरे बांधणाऱ्या बांधकाम व्यवसायिकास सुट * पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना व्याजामध्ये 50 हजाराची अतिरिक्त सूट
श्रीमंतावर बोजा - * 10 लाखापेक्षा अधिक किमतीच्या कार महागणार * एस.यु.व्ही. कारसाठी 4 टक्के, डिझेल कारसाठी 2.5 टक्के, सेस वाढविणार * तंबाखुजन्य सर्व पदार्थ महाग होणार * 1 कोटी कमाई असणाऱ्यांचा सरचार्ज 12 टक्क्यांवरुन 15 टक्के करणार * ब्रँडेड कपडे तसेच चमड्याच्या वस्तू, सोने व हिऱ्याचे दागिने महाग होणार * करपात्र वस्तूंवर अर्धा टक्का अधिभार लावणार अर्थसंकल्प मांडत असतांनाच सेन्सेक्समध्ये 300 अंकांची घसरण झाली होती ती नंतर 600 अंकांपर्यंत घसरतच गेली.










