अहमदनगर - राष्ट्रगीताची मांडणी करुन आंतरभारतीची संकल्पना विषद करतांना त्या त्या प्रदेशातील राहणारे लोकांचे राहणीमान त्यांची संस्कृत...
अहमदनगर - राष्ट्रगीताची मांडणी करुन आंतरभारतीची संकल्पना विषद करतांना त्या त्या प्रदेशातील राहणारे लोकांचे राहणीमान त्यांची संस्कृती तसेच देशाचा किती विकास त्यांच्या पर्यंत पोहचला आहे याचे अवलोकन होणे आवश्यक आहे. तरच खरा भारत आपल्याला समजेल. केवळ ऐकूण किंवा चित्र पाहून भारताची ओळख होणार नाही. अखंड भारत पाहण्याचा आनंद फारच सुखद व आल्हाददायक आहे. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रल्हादराव शितोळे यांनी केले.
समाजातील काही लोक फक्त प्रतिज्ञा वाचतात व म्हणतात परंतु त्याप्रमाणे वागत नाही. ही खरी शोकांतिका आहे. असे मत मा.शितोळे यांनी प.पू.देशभक्त रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती अहमदनगर यांनी आयोजीत केलेल्या आंतरभारती महोत्सवात प्रमुख वक्ते म्हणून मांडले.









