नगर - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पद्मशाली समाजातील कष्टकरी व कर्तृत्ववान महिलांना अहमदनगर शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनाच्या व...

नगर - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पद्मशाली समाजातील कष्टकरी व कर्तृत्ववान महिलांना अहमदनगर शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनाच्या वतीने पद्मकन्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याने त्याबाबत रविवारी दि.21-2-2016 रोजी पद्मशाली समाजाची जाहीर बैठक होणार असल्याची माहिती पद्मकन्या पुरस्कार समितीचे अजयकुमार लयचेट्टी, तिरमलेश पासकंटी, यांनी दिली.
रविवारी होणारी ही बैठक समाजातील सर्वांसाठी खुली असून या बैठकीचे अध्यक्षस्थान पद्मशाली समन्वय समितीचे संस्थापक निमंत्रक प्रा.विठ्ठल बुलबुले भूषविणार आहेत.
या बैठकीत पुरस्कारार्थींची नावे स्वीकारणे, निधीसंकलन, नियोजन, प्रमुख अतिथी आदि विषयावर चर्चा होणार असून याच बैठकीत पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्वागताध्यक्षांची निवड जाहीर कऱण्यात येणार असल्याची माहिती सिमतीचे प्रकाश कोटा यांनी सांगितले.
बैठक रविवारी दि. 21-2-206 रोजी सायंकाळी 5 वा.श्री. मार्कंडेय मंदिरात होणार आहे. तरी या बैठकीत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन पद्मकन्या पुरस्कार समितीच्या वतीने प्रकाश कोटा, अजयकुमार लयचेट्टी, तिरमलेश पासकंटी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.









