आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित बैठकीत आणि पत्रकार परिषदेत तावडे यांनी परस्पर विरोधी भूमिका मांडल्यामुळे विभाजनाबाबतची शासनाची भूमि...
आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित बैठकीत आणि पत्रकार परिषदेत तावडे यांनी परस्पर विरोधी भूमिका मांडल्यामुळे विभाजनाबाबतची शासनाची भूमिका पुरेशी स्पष्ट होऊ शकली नाही.
विद्यापीठाचे विभाजन होणार नाही याउलट विद्यापीठाचा विस्तार करण्याचा विचार करीत आहोत, असे प्रसारमाध्यमांसमोर सांगणार्या शिक्षणमंत्र्यांनी अधिकार्यांच्या बैठकीत मात्र विद्यापीठाचे विभाजन का करण्यात येऊ नये, अशी भूमिका मांडली. नाशिक : राज्यातील कायम विनाअनुदानित १४00 शाळा येत्या शैक्षणिक वर्षापासून अनुदानित करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी दिली. दरम्यान, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विभाजनाबाबत शिक्षणमंत्र्यांनी परस्पर विरोधी भूमिका घेतल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
येथे विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना शिक्षणमंत्री तावडे यांनी शाळा, शिक्षक, प्राध्यापक याविषयीची शासनाची भूमिका मांडली. ते म्हणाले, शिक्षण खाते ऑनलाइन होणार असून दरवर्षी दहा हजार शाळांची रॅँडम तपासणी केली जाईल. तसेच प्राध्यापकांचे नवृत्तीचे वय ६0 वर्षे केल्याने दोन वर्षे अधिक कालावधीसाठी चिरीमिरी देणे थांबेल. शिवाय, प्राध्यापकांच्या संपकाळातील वेतनाबाबत समिती नियुक्त करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल.










