नगर - नवसाला पावणारा मानाचा गणपती तसेच अहमदनगर शहराचे ग्रामदैवत म्हणून प्रचलित असलेले श्री विशाल गणेश मंदिराच्या गर्भगृहाच्या जिर्णोद...
नगर - नवसाला पावणारा मानाचा गणपती तसेच अहमदनगर शहराचे ग्रामदैवत म्हणून प्रचलित असलेले श्री विशाल गणेश मंदिराच्या गर्भगृहाच्या जिर्णोद्धारासाठी चंदनमल केशरचंद मुनोत (नेवासकर मेडिकल ट्रस्ट) यांच्यावतीने रु.1 लाख 1 हजार रुपयांचा धनादेश देवस्थानचे अध्यक्ष ऍड.अभय आगरकर यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी कचरदास मुनोत, लालचंद मुनोत, आनंदराम मुनोत, सोभाचंद मुनोत, सीए मोहन बरमेचा, विनोद फिरोदिया, धीरज मुनोत, नरेश मुनोत, कमलेश मुनोत, देवस्थानचे सचिव अशोक कानडे, विश्वस्त विजय कोथिंबीरे, बाबासाहेब सुडके, पांडूरंग नन्नवरे आदि उपस्थित होते.
राज्यात प्रचित असलेले शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिराचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असून, आता फ्क्त मंदिराच्या गर्भगृहाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने लवकरच अतिभव्य असे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाईल, असे अॅड.आगरकर यांनी सांगितले.
मुनोत परिवाराच्यावतीने आनंदराम मुनोत म्हणाले की, आमच्या परिवाराच्यावतीने व नेवासकर मेडिकल ट्रस्टच्यावतीने या मंदिराच्या कामामध्ये आपलाही काही वाटा असावा, या सामाजिक भावनेने ही देणगी श्री विशाल चरणी अर्पण केली असे सांगत कृतज्ञता व्यक्ते केली.









