नगर- उत्कर्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्था गेल्या 7 वर्षापासून महिला बचत गट सक्षमीकरण, स्वयंरोजगार प्रशिक्षण, रक्तदान, नेत्रदान, नेत्रतप...
नगर- उत्कर्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्था गेल्या 7 वर्षापासून महिला बचत गट सक्षमीकरण, स्वयंरोजगार प्रशिक्षण, रक्तदान, नेत्रदान, नेत्रतपासणी, आरोग्य शिबीरे आदि क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने दि.17 एप्रिल 2016 रोजी जिल्हा क्रीडा कार्यालयांतर्गत युवक कल्याण योजनेंतर्गत ब्युटीपार्लर प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन व भव्य रक्तदान शिबीर तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्षा नयनाताई बनकर यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.राम शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रणपत्र दिले, यावेळी पालकमंत्री ना.शिंदे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करुन निमंत्रण स्विकारले. या शिष्टमंडळात नयनाताई बनकर, प्रसाद भडके, चित्रा गवारे, संगीता गवारे, सुरेखा आरोळे, शितल देशमाने आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय युवा ऍकेडमीचे अध्यक्ष ऍड.महेश शिंदे, विजय मिसाळ, पोपटराव बनकर, ऍड.भानुदास होले आदि प्रयत्नशील आहे.










