नगर - क्रांतीसुर्य जोतीबा फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती लवकरच नगर शहरातून, जिल्ह्यातून साजरी होणार असून डॉ.बाबासाहेब आं...
नगर - क्रांतीसुर्य जोतीबा फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती लवकरच नगर शहरातून, जिल्ह्यातून साजरी होणार असून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीचे नियोजनासाठी दि. 16 मार्च रोजी सांयकाळी 5 वा. तक्षशिला बुध्दविहार, सर्जेपुरा येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर नियोजन बैठकीस ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड, अभियंता परिमल निकम, अभियंता महेंद्र राजगुरु, प्रा.जयंत गायकवाड, मा.नगरसेवक अजय साळवे, विलास साठे, पी.आर.पी.चे जिल्हाध्यक्ष सुनिल क्षेत्रे आदि मार्गदर्शन कऱणार आहेत अशी माहिती जि. सरचिटणीस महेश भोसले यांनी दिली आहे.










