अहमदनगर - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., अहमदनगर या बँकेच्या सेवकांच्या पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनलच्या 16 संचा...
अहमदनगर - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., अहमदनगर या बँकेच्या सेवकांच्या पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनलच्या 16 संचालकपदी बिनविरोध निवड झाली. या संस्थेच्या 2015-16 ते 2020-21 या कालावधीसाठी 21 संचालक मंडळाच्या जागेपैकी बँकेचे कार्यलक्षी संचालक व संस्थेचे विद्यमान संचालक हरिभाऊ भोसले यांच्या सह सहकारी पॅनलच्या 16 संचालकाची निवड झाली. तसेच उर्वरीत 4 मतदार संघातील 5 जागांसाठी शुक्रवार दि. 25 मार्च 2016 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4.00 वाजेपर्य़ंत मतदान होणार आहे.
सर्वश्री बाळासाहेब हरिभाऊ भोसले, प्रकाश गणपत गायके, अशोक यशवंत लिप्टे, कैलास आनंदा गवळी, सुखदेव देवराम पचपींड, धनाजी श्रीपत शेटे, भाऊसाहेब नारायण चेके, शिवाजी चंद्रभान जाधव, रामदास दशरथ कासार, कुंडलिक त्रिंबक भापसे, प्रभाकर कान्हु लाळगे, भारत उध्दवराव इथापे, दत्तात्रय भागवत सरोदे, युवराज विनायक तनपुरे, अनिल विठ्ठलराव खांदे, सरेश सोपानराव तरटे यांची बिनविरोध निवड झाली.
ही निवड बिनविरोध होण्यासाठी बँकेचे मुख्य कार्य़कारी अधिकारी सर्वश्री आर.एल.वर्पे, कुकडी कारखान्याचे संचालक बाजीराव मुरकुटे, के.बी.भिंगारकर, सिध्दार्थ वाघमारे, भिमराव घोडके, पी.के.वर्पे, अशोकराव आठरे, के.पी.थोरात, जनार्धन मोढळे, आण्णासाहेब म्हस्के व इतर अनेक सहकार्य़ांनी पुढाकार घेतला.










