नगर - बेळगाव जिल्ह्यातील ता.चिकोडे येथील शेंदूर याठिकाणी रासाई भैरवनाथ यात्रेतील कुस्तीत पै.नंदकुमार सुनिल रेपाळे यांनी दोन किलो चां...
नगर - बेळगाव जिल्ह्यातील ता.चिकोडे येथील शेंदूर याठिकाणी रासाई भैरवनाथ यात्रेतील कुस्तीत पै.नंदकुमार सुनिल रेपाळे यांनी दोन किलो चांदीची गदा पटकावली.
श्रीगोंदा तालुक्यातील पारगांव सुद्रिक येथील पैलवान नंदकुमार सुनील रेपाळे यांचा शेंदूर येथील रासाई भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्तीत संतोष पडलकर यांच्याशी सामना झाला. या सामन्यात पै.नंदकुमार रेपाळे यांनी पडलकर यास चारी मुंड्या चित करत दोन किलोची चांदीची गदा व रोख पारितोषिक पटकावले आहे. त्यावेळी त्यांना रसाई केसरीने सन्मानित करण्यात आले.
या यशाबद्दल पै.नितीन मोरे, संभाजी मडके, अक्षय कोठारे, रवि कोठारे, संदिप भोनगे, राजेंद्र मोरे, ऋषिकेश मोरे, सागर विधाते, तुकाराम आघाव, मंगेश घोडके, सुरेंद्र शिंदे, विजय राऊत, सुनिल झेंडे, इऱशात शेख व पारगांव सुद्रिक व्यायाम शाळा व ग्रामस्थांच्या वतीने रेपाळे यांचा नगारी सत्कार करण्यात आला.










