नगर - शिक्षक हक्क कायद्यानुसार प्राथमिक माध्यमिक शाळांतील शिक्षक विद्यार्थी प्रमाणाचे गुणोत्तर बदलते आहे. नवीन निकषाप्रमाणे ऑगस्ट 2015...
नगर - शिक्षक हक्क कायद्यानुसार प्राथमिक माध्यमिक शाळांतील शिक्षक विद्यार्थी प्रमाणाचे गुणोत्तर बदलते आहे. नवीन निकषाप्रमाणे ऑगस्ट 2015 मध्ये शिक्षक विद्यार्थी प्रमाण ठरविण्यात आले. त्यानुसार नवीन संच मान्यता करण्यात आली. ही शिक्षक संच मान्यता शिक्षक भारतीला अमान्य असल्याचे शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे व कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्था सरकारी, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित शाळा अशा सर्वच शाळांचा या नवीन संच मान्यतेत समावेश आहे. आता जी शिक्षक संच मान्यता झाली आहे ती शिक्षकांवर घाला घालणारी असल्याने या संच मान्यतेत अनेक शिक्षक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, ग्रंथपाल, अतिरिक्त झालेल आहेत. या सर्वांचा आकडा काही हजारांच्या वरती आहे. त्यामुळे ही संच मान्यता रद्द करण्यात यावी व पूर्वीप्रमाणेच शिक्षकमंच मान्यता व्हावी यासाठी शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, राज्य सचिव सुनिल गाडगे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे, कार्य़ाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, मिनाक्षी सुर्य़वंशी, विभावरी रोकडे, संध्या गावडे, शकुंतला वाळुंज, जान्हवी नरसाळे, छाया लष्करे, सुरेश सरोदे, हनुमंत रायकर, देवराम दरकर, बेबीनंदा लांडे आदिंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन 2015-16 ची संच मान्यता रद्द करम्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. नुसत्या मुंबईसह अनेक शाळांमधील प्रत्येक शाळेत पाच किंवा अधिक शिक्षक अतिरिक्त ठरत असल्याची माहिती सुनिल गाडगे यांनी दिली आहे.










