अहमदनगर - जिल्हा न्यायालयाचे भूमीपुजन सर्वसाधारपणे सन 2009-10 दरम्यान त्यावेळचे शहर वकील संघाचे अध्यक्ष अॅड.शहाजीराव दिवटे, उपाध्यक्...
अहमदनगर - जिल्हा न्यायालयाचे भूमीपुजन सर्वसाधारपणे सन 2009-10 दरम्यान त्यावेळचे शहर वकील संघाचे अध्यक्ष अॅड.शहाजीराव दिवटे, उपाध्यक्ष अॅड.सुधीर टोकेकर, सेक्रेटरी अॅड.संतोष वाळुंज व त्यांचे सर्व पदाधिकारी यांच्या कार्यकालात न्यायनगर येथे संपन्न झाले होते.
याबाबत कार्यारंभ आदेश दि.1/11/2011 पासून कार्य़कारी अभियंता, सा.बां.विभाग, अहमदनगर यांनी दिले होते व हे काम बांद्रा, मुंबई येथील निरकॉन कन्स्ट्रक्शन कंपनी यांना देवून बांधकामाची मुदत 30 महिने एवढी दिलेली होती.
मात्र हे ठेकेदारास हस्तांतर करण्यास विलंब झाल्यामुळे व वाळूचे लिलाव न झाल्यामुळे या इमारतीस उशीर झाल्याचे व सदर इमारत पूर्ण करण्याबाबत 31/05/2016 पर्यंत मुदतवाढ दिल्याचे तसेच ठेकेदारास वरील कारणास्तव दंड आकारण्यात आलेला नाही, सदर न्यायालयीन इमारत बांधकामासाठी सध्या निधी उपलब्ध असून बिल्डींग फर्निचर सप्टेंबर 2016 मध्ये पू्र्ण कऱण्याचे नियोजन असल्याची माहिती उपअभियंता, बांधकाम उपविभाग, अहमदनगर यांनी माहिती अधिकारात नगर शहर वकील संघटनेचे माजी उपाध्यक्ष अॅड.सुधीर टोकेकर यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली असता दि.11/3/2016 च्या पत्रान्वये कळविले आहे.
सदर इमारत नियोजनानुसार होवून प्रत्यक्षात कोर्टाचे कामकाज लवकरात लवकर सुरु व्हावे अशी सर्व वकील वर्गाची व नागरीकांची अपेक्षा आहे.










