नगर - गेल्या 5 ते 7 वर्षांपासून प्रभाग 20 मध्ये ड्रेनेजलाईनच्या कामाअभावी मोठी समस्या होती, तसेच पाण्याचाही मोठा प्रश्न होता. याकडे न...
नगर - गेल्या 5 ते 7 वर्षांपासून प्रभाग 20 मध्ये ड्रेनेजलाईनच्या कामाअभावी मोठी समस्या होती, तसेच पाण्याचाही मोठा प्रश्न होता. याकडे नगरसेविका मंगला गुंदेचा यांनी आपले लक्ष वेधले व निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. आपणही तातडीने प्रतिसाद देत या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. यापुढील काळात प्रभाग 20 मधील प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
प्रभाग 20 मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या विकासनिधीतून फेज-2, कॉंक्रिटीकरण, ड्रेनेज व इतर कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेविका मंगला सतीश गुंदेचा, गणेश दहिहंडे, तेजस गुंदेचा, हिमेश पोरवाल, कमलेश सारडा, पवन सोनग्रा, प्रकाश सूर्यवंशी, सादिक बागवान, जहांगीर पठाण, कुद्दूस बागवान, राजू कानडे, सौ. कांचन शर्मा, र्रिेंक बागवान, पवार, अग्रवाल आदी उपस्थित होते.










