नगर - येथील तारकपुर येथील सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये विविध सामाजिक कार्यात सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणार्या पंजाबी सेवा स...
नगर - येथील तारकपुर येथील सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये विविध सामाजिक कार्यात सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणार्या पंजाबी सेवा समितीच्यावतीने रविवार दि.27 मार्च रोजी भव्य मोफत सर्वरोग निदान शिबीर तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे स.10 ते 5 यावेळेत आयोजन करण्यात आले आहे. सर्व रुग्णांची तपासणी होणार आहे, अशी माहिती पंजाबी सेवा समितीचे अध्यक्ष अजय पंजाबी यांनी दिली.
या शिबीरामध्ये पुण्याच्या संचेती हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ञ डॉ.अजय कोठारी हे रुग्णांच्या हाडांमधील कॅल्शियमच्या प्रमाणाची तपासणी तसेच इतर तपासण्या करणार आहेत. तसेच या शिबीरात डॉ.हरमित कथुरिया, डॉ.रविंद्र सानप, डॉ.सतीश फाटके, डॉ.प्रमोद जगताप हे हृदयरोग तज्ञ रुग्णांची तपासणी करणार आहेत. तसेच दिपक हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.सौ.वैशाली किरण या स्त्रीरोग तपासणी करणार आहेत. बुधराणी आय हॉस्पिटल पुणे द्वारा या शिबीरात रुग्णांची मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबीरासाठी येतांना रुग्णांनी आवश्यक कागदपत्रे बरोबर घेऊन यावेत.
तरी नगर शहर व जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या भव्य मोफत सर्वरोग निदान शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंजाबी सेवा समितीच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सुनिल सहानी मो.9271381010 व विनोद दिवाण मो.9657603850 यांच्याशी संपर्क साधावा.










