नगर - यंदा सगळीकडेच भीषण दुष्काळ पसरला असून नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. ही सगली परिस्थिती...
नगर - यंदा सगळीकडेच भीषण दुष्काळ पसरला असून नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. ही सगली परिस्थिती पाहता पोखर्डी येथील छत्रपती ग्रुप व तंटामुक्तीचे अध्यक्ष विक्रम भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी एकत्र येऊन पाण्याचा हा प्रश्न दूर करण्याचा निर्णय घेतला.
शिवजयंती गावाच्या वतीने दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते. यंदा मिरवणूक खर्चास फाटा देऊन या पैशांचा उपयोग गावाला 3 महिने टँकरद्वारे पाणी देण्यासाठी करण्यात येणार आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करुन लगेच टँकरद्वारे पाणी देण्याचे काम सुरु करण्यात आले. यावेळी प्रा.सीताराम काकडे, दिगंबर जावळे, आदेश भगत, राहुल बोरुडे, अशोक सुसे, विजय दाणी, अमोल आल्हाट, डॉ.भगवान चौरे आदि उपस्थित होते.










