नगर- आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांच्या 24 व्या स्मृतीदिनानिमित्त नगरमध्ये प्रथमच 45 गायक वादकांचा सहभाग असलेला ‘ट्रिब्युट टू लिजंडस्’ हा भ...
नगर- आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांच्या 24 व्या स्मृतीदिनानिमित्त नगरमध्ये प्रथमच 45 गायक वादकांचा सहभाग असलेला ‘ट्रिब्युट टू लिजंडस्’ हा भक्तीसंध्येचा कार्यक्रम दि.28 रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे.
आजची आघाडीची गायिका अभिलाषा चेल्लम तसेच सर्वेश मिश्रा, प्रशांत नासेरी, संदीप उबाळे, संपदा गोस्वामी हे गायक विविध गाणी सादर करणार आहेत. हा भक्ती संध्येचा कार्यक्रम आनंदधाम प्रांगणात सायंकाळी 7 वा. होईल. जैन सोशल फेडरेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ख्यातकीर्त संगीतकार, गायक शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, किशोरजी, मदन-मोहन यांना साथ संगम करणार्या सर्वश्रेष्ठ 30 वादक कलाकारांचा यात सहभाग आहे. तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात एकाच वाद्यातून अनेक वाद्यांचे आवाज येतात. परंतु भक्तीसंध्यामध्ये बासरी, सतार, मेंडोलियन, ट्रम्पेट, कोम्बो, बोंगो याचबरोबर व्हायरब्रोफोन ही वाद्ये असतील. एकाच वेळेला 45 गायक-वादकांचा संच स्वरमंचावर आपली कला पेश करेल. जुन्या जामान्यातील गीते, भक्ती व भावगीते सादर केली जातील. या कार्यक्रमाचे निवेदन पराग माटेगावकर करणार आहेत.
भक्तीसंध्या हा कार्यक्रम नगरमध्ये पहिल्यांदाच होत असून नगरकर रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन फेडरेशनचे कार्यकर्ते सचिन भंडारी,सौ.सरोज कटारिया, उमेश बोरा, गिरीश शिंगी यांनी केले आहे.










