श्रीगोंदा - श्रीगोंदा शहरासाठी घोडधरणावरुन पाणीपुरवठा करणारी सुमारे 49 कोटी रुपयांची महत्वाची योजना नुकतीच सुरु झाली आहे. माजी मंत्री ब...
श्रीगोंदा - श्रीगोंदा शहरासाठी घोडधरणावरुन पाणीपुरवठा करणारी सुमारे 49 कोटी रुपयांची महत्वाची योजना नुकतीच सुरु झाली आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पुढाकार घेऊन ही योजना मार्गी लावली त्यामुळे शहर तसेच परिसर नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आङे. पाण्याचे जलपुजन समारंभ शुक्रवार दि.1 एप्रिल 2016 रोजी सकाळी 10 वाजता राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते व प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते होणार असल्याने माहीती मुख्याधिकारी धनंजय कोल्हेकर यांनी दिली.
साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, कुकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप, जि.प.चे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, सदाशिवराव पाचपुते यांच्या उपस्थितीत हा कार्य़क्रम संपन्न होत आहे.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्षा छाया गोरे, उपनगराध्यक्ष अख्तर शेख, भागचंद घोडके, मनोहर पोटे व नगर सेवकांच्या वतीने कऱण्यात आले आहे.










