पुणे - राज्य शासनाच्या वतीने वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमांच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशाच्या राज्य सामाईक ...
यंदापासून 'एचएमटीसीईटी' परीक्षा पवेश नियामक प्राधिकरण आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष
यांच्यामार्फत घेतली जाणार आहे. यापुर्वी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञान अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी स्वतंत्रपणे प्रवेश परीक्षा द्यावी लागत होती. मात्र यंदा राज्य शासनाच्या प्रवेश नियमन प्राधिकरण आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सर्व भ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एकच प्रवेश परीक्षा राहणार आहे. सीईटीचे अर्ज आजपासून संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भऱण्यास सुरवात केली आहे. प्रवेश प्रक्रियेसंबंधातील प्राथमिक माहिती, ऑनलाईन अर्ज भरण्याची कार्य़पध्दती, तसेच माहिती पुस्तिका या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी माहितीपुस्तिका घेऊन ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाईन अर्ज - 1 ते 22 मार्च
चलनासह अर्ज - 3 ते 25 मार्च
ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध - 25 एप्रिल ते 30 एप्रिल
परीक्षा - 5 मे
परीक्षेचा निकाल - 1 जून
संकेतस्थळावर निकालपत्र - 14 जून










