नगर-शहराच्या रस्ते, वीज, पाणी प्रश्नांबरोबरच उपनगरातील धार्मिक क्षेत्राचा विकास कसा करता येईल, याकडे लक्ष केंद्रीय केले आहे. पाईपला...
नगर-शहराच्या रस्ते, वीज, पाणी प्रश्नांबरोबरच उपनगरातील धार्मिक क्षेत्राचा विकास कसा करता येईल, याकडे लक्ष केंद्रीय केले आहे. पाईपलाईन रोडवरील श्रीराम चौकात आयोध्या नगरीतील महादेव मंदिर येथील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराजवळ मोठा सभामंडप व 2 खोल्यांच्या बांधकामासाठी खासदार दिलीप गांधी यांच्या निधीतून 7 लाख रुपये देण्याची घोषणा नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी केली.
महाशिवरात्रीनिमित्त येथे सुरु असलेल्या भागवत कथाप्रसंगी आरतीसाठी श्री.गांधी आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक सचिव जाधव, नगरसेविका दिपाली बारस्कर, बाळासाहेब बारस्कर, संजय बुधवंत आदि उपस्थित होते.










