नेवासा - येथील त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठानच्या वस्तीगृहामध्ये राहत असलेल्या मुलाच्या मित्रावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या चंद...
नेवासा - येथील त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठानच्या वस्तीगृहामध्ये राहत असलेल्या मुलाच्या मित्रावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या चंद्रकांत ज्ञानेश्वर बारणे याला सात वर्ष सक्तमजुरीसह इतर कलमांसाठी विविध शिक्षा ठोठावण्यात आल्या.
त्रिमुर्ती पाव प्रतिष्ठानच्या वस्तीगृहात चाकणच्या पानसरे मळ्यामध्ये राहणारे चंद्रकांत ज्ञानेश्वर बारणे यांने 11 ऑगस्ट 2013 रोजी 12.30 वा. त्याचा मुलगा रोहित याच्या बाजूच्या खोलीत राहत असणाऱ्या पिडीत लहान मुलाला लघुशंकेसाठी जागा कुठे हे दाखव असे विचारले. सदरच्या मुलाने बारणे यास प्रशासकीय ईमारतीच्या वरील बाजूस होस्टेलच्या बाथरुमकडे नेले असता बारणे याने बळजबरीने ओढून लैंगिक अत्याचार केला. यावर मुलाने विरोध केला असता तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील बी.एल.तांबे व प्रमोद वल्टे यांनी काम पाहिले. खटल्यामध्ये विकास विजय पाटील, गौरव शशिकांत कांचन व पोलीस निरीक्षक मुकूंद आघाव यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सदरचा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात गर्दी झाली होती.
न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी चंद्रकांत बारणे यास 377 च्या लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण अधिनियम कलम 12 अन्वये दोषी ठरवले पण शिक्षा दिली नाही. मात्र 2012 चे कलम 4 अन्वये सात वर्ष सक्तमजुरी व 500 रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजूरीची शिक्षा दिली. 397 कलमान्वये पिडीत मुलाला 25 हजार रुपये नुकसान भरपाई व न दिल्यास सहा महिने कारावास तसेच 323 प्रमाणे सहा महिने शिक्षा व 500 रु.देड आणि दंड न भरल्यास सात दिवस कारावास अशा शिक्षा ठोठावल्या तर कलम 506 मध्ये निर्दोष ठरवण्यात आले आहे. या विचित्र खटल्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.










