नगर - प्रभाग 8 मध्ये अनेक नवीन बांधकाम प्रकल्प उभे राहिले असून, नव्याने अनेक नागरी वसाहती होत आहेत. ही बाब विचारात घेऊनच प्रभागात काम...
नगर - प्रभाग 8 मध्ये अनेक नवीन बांधकाम प्रकल्प उभे राहिले असून, नव्याने अनेक नागरी वसाहती होत आहेत. ही बाब विचारात घेऊनच प्रभागात कामांचे नियोजन करीत आहे. भविष्यातील वाढती लोकसंख्या विकासकामे करताना विचारात घेतल्यामुळे वारंवार कामे करावी लागणार नाहीत. कामाच्या दर्जाबाबत मी नेहमीच स्वतः जातीने लक्ष देत असते. नागरिकांनीही याबाबत लक्ष द्यावे, तसेच नवलेनगर येथील विकासकामे पूर्ण झाल्यानंतर या भागाला चांगली शोभा येईल. निधी अभावी कामे करताना मोठी अडचण येत असून, पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावत आहे, असे प्रतिपादन नगरसेविका उषाताई नलवडे यांनी केले.
अ.नगर मनपा प्रभाग 8मधील नवलेनगर येथे नगरसेविका उषाताई नलवडे यांच्या प्रयत्नातून बंद पाईप गटार, रस्ता कॉंक्रिटीकरण व पेव्हींग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ महिला शालिनी देखणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नलवडे बोलत होत्या. याप्रसंगी संपत नलवडे, मंजुळा बारवकर, सुभद्रा पाठक, सुमन टाक, सौ. भाकरे, संदेश काकडे, अनिल देखणे, दीपक घोलप, अनिल भोले, दिवटे, प्रकाश पालवे, नवरे, पाठक, संजय साठ्ये, शुक्रे, सिद्धार्थ वाघमारे, भवरे, सर्वोत्तम वैकर, लौंढे, संजय साठ्ये आदी उपस्थित होते.










