विरोधकांनी सोडला मतमोजणी कक्ष सत्ताधारी सदिच्छा महाआघाडीचा पराभव: गुरुकुल-बहुजन महाआघाडी दुसऱ्या स्थानावरराजू शेख आम्ही जिंकलो.....
विरोधकांनी सोडला मतमोजणी कक्ष
सत्ताधारी सदिच्छा महाआघाडीचा पराभव: गुरुकुल-बहुजन महाआघाडी दुसऱ्या स्थानावरराजू शेख आम्ही जिंकलो.. निवडणूक निकालानंतर विजयी झालेल्या महिला उमेदवारांना त्यांच्या पतीराजांनी उचलून घेत विजयाचा जल्लोष केला. या रणरागिणींनीही 'मी जिंकले' अशी विजयी पोझ दिली. दुसऱ्या छायाचित्रात अभिनंदनाचे दूरध्वनी स्वीकारताना विजयाचे शिल्पकार व गुरुमाउलीचे नेते रावसाहेब रोहोकले आणि बापू तांबे. सविस्तर निकाल हॅलो/४ सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. स्वच्छ आणि पारदश्री कारभार करणार. सभासदांना निवडणुकीत दिलेली वचने पूर्ण करणार. कोअर बँकिंग एक महिन्यात पूर्ण करणार. कोअर बँकिंग संदर्भात संबंधित संस्था चालढकल करीत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार.
- रावसाहेब रोहकले, संचालक तथा नेते गुरुमाउली. जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत सभासदांनी दिलेला कौल मान्य आहे. यापुढील काळात सदिच्छा मंडळ बँकेच्या संचालक मंडळाला विधायक कामात सहकार्य करणार आहे. निवडून आलेल्या संचालक मंडळाला शुभेच्छा आणि सदिच्छा. आमच्या संचालक मंडळावरील सभासदांची नाराजी काढण्यात आम्ही कमी पडलो.
-राजेंद्र शिंदे, नेते महाआघाडी. बंडखोरी शमली असे वाटले. मात्र, ती पूर्णपणे शमलेली नव्हती. त्याचा फटका बसला. रावसाहेब रोहकले यांना जिल्ह्याने चांगली संधी दिली आहे. त्यांनी दिलेल्या वचनामाप्रमाणे काम करावे. गुरुकुल मंडळाकडून त्यांना शुभेच्छा. विकास मंडळ आणि बँकेतून सदिच्छा हद्दपार झाली आहे. गुरु कुल मंडळाचे सामान्य सभासद चांगले लढले, मंडळाला त्यांचा अभिमान आहे.
-संजय कळमकर, नेते गुरुकुल मंडळ. ■ गुरुमाउलीची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट होताच विरोधकांनी मतमोजणी स्थळावरून काढता पाय घेतला. दुपारनंतर गुरुकुल वगळता अन्य मंडळांचे मतदान प्रतिनिधी देखील निघून गेले होते. मतमोजणी कक्षाबाहेर पोलीस आणि गुरुमाउली मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये धूसफूस सुरू होती. अखेर या ठिकाणाहून पोलिसांनी गुरुमाउलीच्या कार्यकर्त्यांना काढून दिले. दरम्यान, गुरुमाउलीचे नेते रोहकले यांना पोलिसांनी नोटीस बजावत मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारली.
अहमदनगर : अत्यंत चुरशीने झालेल्या जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत सभासदांनी सत्ताधारी सदिच्छा महाआघाडीचा पराभव करत रावसाहेब रोहकले यांच्या नेतृत्वाखालील गुरुमाउली मंडळाच्या हाती बॅंकेच्या चाव्या सोपविल्या आहेत. या मंडळाने बँकेच्या २१ पैकी सर्वच जागांवर विजय मिळविला. गुरुकुल-बहुजन आघाडीलाही पराभवास सामोरे जावे लागले असून ते दुसर्या स्थानावर गेले आहेत.
गत सहा महिन्यापासून शिक्षक बँकेच्या निवडणुकीची धामधूम सुरु होती. २१जागांसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी मतमोजणीत गुरुमाउली मंडळाने साधारण एक हजाराहून अधिक मताधिक्यांनी विजय संपादन केला. बँकेचे ९ हजार ८00 सभासद आहेत. त्यापैकी ९ हजार ६00 (९८ टक्के) मतदान झाले होते. गुरुमाउली मंडळाला ४ हजारांहून अधिक मते पडली. सत्ताधारी सदिच्छा आणि महाआघाडीचा आकडा २ हजार २00 च्या पुढे सरकू शकला नाही, तर गुरुकुल मंडळाचा गाडा ३ हजार २00 मतांच्या जवळपास अडकून पडला.
सकाळी ८ वाजता जिल्हा सैनिक लॉन येथे मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या पेटीतील पाच तालुक्यातील सर्वसाधारण जागेसाठीच्या मतपत्रिका एकत्रीत करण्यात आल्या. त्यानंतर तालुकानिहाय मोजणी करण्यात आली. पाच तालुक्यात गुरुमाउली मंडळाने निर्णायक आघाडी घेतली. या ठिकाणी गुरुमाउलीच्या सर्वच उमेदवारांनी ४ हजारांच्या पुढे मताधिक्य घेतले होते. अकरा वाजता निकालाचा कल गुरुमाउली मंडळाच्या बाजूने जात असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे गुरुमाउलीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला. पावणे बारा वाजता गुरुमाऊलीचे नेते रावसाहेब रोहकले मतमोजणी कक्षाच्या बाहेर आले. कार्यकर्त्यांनी त्यांना डोक्यावर उचलून घेतले.
दुपारनंतर मतमोजणीची प्रक्रिया धिम्या गतीने सुरू होती. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वसाधारण मतदारसंघातील १४ तालुक्यातील मतमोजणी पूर्ण झालेली नव्हती. मतमोजणीला गुरुमाउलीचे नेते बापूसाहेब तांबे, संजय शेळके, सदिच्छाचे नेते राजेंद्र शिंदे, अनिल आंधळे, गुरुकु लचे संजय धामणे, राजेंद्र जायभाय, नितीन काकडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
बँकेवर झालेले आर्थिक घोटाळ्यांचे आरोप, कोअर बँकिंग, वारेमाप खर्च, एक टक्का लाभांश या बाबींचा सत्ताधार्यांना फटका बसला. मागील सत्तेविरोधात नाराजी व्यक्त करत रोहोकले यांनी राजीनामा दिला होता. तो त्यांचा त्याग मतदारांनी स्वीकारल्याचे आज दिसून आले. गुरुकुल मंडळाला यावेळी बहुजन आघाडीची साथ मिळाली होती. मात्र, त्यांचा मतदानाचा आकडा ३ हजार २00 च्या पुढे सरकू शकला नाही. गुरु कुल मंडळात झालेली बंडाळी त्यांना हाणीकारक ठरली.










