Archive Pages Design$type=blogging

पोलीस पत्नीचे मंगळसूत्र चोरले

अहमदनगर : शाळेतून घराकडे रस्त्याने पायी जाणार्‍या महिलेच्या गळ्य़ातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र मोटारसायकलवरील अनोळखी दुचा...



अहमदनगर : शाळेतून घराकडे रस्त्याने पायी जाणार्‍या महिलेच्या गळ्य़ातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र मोटारसायकलवरील अनोळखी दुचाकीस्वाराने बळजबरीने हिसकावून घेतले. ही घटना नगर-मनमाड रोडवरील ऑक्झिलिअम शाळेजवळ गुरुवारी सकाळी दहा वाजता घडली. बारा तासांमध्ये आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.

पोलीस कर्मचारी संजीव पाटोळे यांची पत्नी सुनीता पाटोळे या शाळेतून घराकडे निघाल्या होत्या. यावेळी लाल रंगाच्या नंबर नसलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्य़ातील मंगळसूत्र हिसकावले. चोरलेले मंगळसूत्र दोन तोळ्य़ाचे आणि ४0 हजार रुपये किंमतीचे असल्याचे सुनीता पाटोळे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्यानंतर तोफखाना पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने तपासाची चक्रे फिरविली. रेकॉर्डवरील आरोपींना ताब्यात घेवून चौकशी केली असता एकाने मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडील आढळून आलेले चोरीचे मंगळसूत्र हे पाटोळे यांचेच असल्याचे स्पष्ट झाले. ते लगेच ताब्यात घेण्यात आले. 

हनुमंत येलू शिंदे (रा. लेखानगर, पाईपलाईन रोड) असे आरोपीचे नाव आहे. त्याला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, असे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी सांगितले. चोरी करण्याची पद्धती आणि साक्षीदार यावरून चोर कोण आहे, याचा तपास लागला असे पाटोळे यांनी सांगितले.

स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक संजयकुमार सोनी, कर्मचारी योगेश गोसावी, शैलेश गोमसाळे, रोहित मिसाळ, प्रमोद जाधव, देवा काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: पोलीस पत्नीचे मंगळसूत्र चोरले
पोलीस पत्नीचे मंगळसूत्र चोरले
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s320/04.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s72-c/04.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_0.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_0.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago