जिल्ह्यात ग्रामीण भागात वाड्या- वस्त्यांवर बिबट्यांचे मनुष्यावर हल्ले वाढले आहेत. त्यासोबत पाळीव प्राणी यांचे बळी जात आहेत. यासह र...
जिल्ह्यात ग्रामीण भागात वाड्या- वस्त्यांवर बिबट्यांचे मनुष्यावर हल्ले वाढले आहेत. त्यासोबत पाळीव प्राणी यांचे बळी जात आहेत. यासह रानडुकरांमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. वन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेसह बाधीत व्यक्ती, शेतकरी यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या १४८ प्राथमिक शाळांच्या परिसरात धोकादायक विद्युत खांब, ३९८ ठिकाणी विजेच्या तारा आणि ९ ठिकाणी विजांचे रोहित्र आहेत. महावितरणने तातडीने हे खांब, तारा आणि रोहित्र हलवण्याची मागणी वीज वितरण विभागाकडे केली आहे. जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली आहे.
मंजुषा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जलव्यवस्थापन समितीची बैठक झाली. सुरुवातीला जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाच्या टाक्या, जागा, साठवण तलावाची जागा, पंपघरची जागा आदी मालमत्तेची नोंदी अद्ययावत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नगर तालुक्यातील हिवरेझरे, गुंडेगाव व भोयरेपठार येथील पाझर तलावाची जागा मोजणीसाठी निधी जिल्हा परिषदेने तालुकास्तरावर वितरीत केला आहे. भोयरेपठार येथील जागा मोजणीसाठी निधी कोणत्या विभागाने द्यावयाचा यावर नगर पंचायत समितीत निर्णय न झाल्याने जागेची मोजणी झालेली नाही. निधी असताना मोजणीस टाळाटाळ करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सोनई, करजगाव ही प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होत नसल्याने सोनईला पिण्यासाठी टँकर सुरू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती शरद नवले, मीरा चकोर, बाबासाहेब दिघे, सदस्य अँड. सुभाष पाटील, हर्षदा काकडे, सुनील गडाख, संदेश कार्ले आदी उपस्थित होते.










