नगर - जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये रुग्ण सेवा प्रभावामुळेच मी माझे सर्वस्व हॉस्पिटलच्या पुढील सेवा कार्येसाठी अ...
नगर - जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये रुग्ण सेवा प्रभावामुळेच मी माझे सर्वस्व हॉस्पिटलच्या पुढील सेवा कार्येसाठी अर्पण केले असे प्रतिपादन राष्ट्रसंत आचार्यसम्राट प.पू.आनंदऋषीजी म.सा.यांच्या 24 व्या पुण्यस्मृतीदिनाच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती कमलाबाई मुनोत यांनी केले.
24 व्या स्मृतीदिनानिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटल व लायन्स क्लब ऑफ सेवा यात्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हार्निया व संबंधित आजार शिबीराचे दिपप्रज्वलनाने उद्घाटन आयोजक श्रीमती कमलाबाई हस्तीमलजी मुनोत (निंभोरीवाला) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, डॉ.प्रविण मुनोत, डॉ.विवेक भापकर, सतीश लोढा, डॉ.प्रकाश कांकरीया, माणकचंद कटारिया, वसंत चोपडा, डॉ.आशिष भंडारी आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ.प्रकाश कांकरिया यांनी हॉस्पिटलच्या सेवा कार्य़ाविषयी माहिती दिली. गेल्या 20 वर्षापासून हॉस्पिटलच्या माध्यमातून अविरतपणे रुग्णांची सेवा अत्याधुनिक मशिनरी व अत्यल्प दरात सुरु असून, संपूर्ण राज्यातील रुग्ण या सेवेचा फायदा घेत आहेत असे सांगितले.
संभाजी कदम म्हणाले, सर्वसामान्यांचे दुःख कमी कऱण्यासाठी अतिशय पवित्र अशा वास्तूमध्ये या रुग्णसेवेचे कार्य सुरु असून, रुग्णांचे दुःख कमी करण्यामध्ये हे हॉस्पिटल सुख पहात आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून या हॉस्पिटलचे असलेले प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करु असे, ते म्हणाले.
या शिबीरात 190 रुपयांची तपासणी करण्यात आली. यासाठी डॉ.प्रविण मुनोत व डॉ.विवेक भापकर यांनी सहकार्य़ केले.









