अहमदनगर - येथील सामाजिक कार्यकर्त्ये व राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट "ख्वाडा" या चित्रपटातील सिनेअभिनेते रघुनाथ आंबेडकर...
अहमदनगर - येथील सामाजिक कार्यकर्त्ये व राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट "ख्वाडा" या चित्रपटातील सिनेअभिनेते रघुनाथ आंबेडकर यांना संत रोहिदास महाराज जयंती निमित्ताने राज्यस्तरीय उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहिर केला आहे असे संस्थेचे अध्यक्ष भारत कांबळे सर यांनी पत्रकात म्हटले आहे.
रघुनाथ आंबेडकर यांनी अनेक टी.व्ही.मालिका व चित्रपटात काम केले असून वास्तुपुरुष, शुभमंगल सावधान, राजकारण, टोकन नंबर, झाले मोकळे आकाश अशा अनेक अनेकविध चित्रपटातील भूमिका साकारल्या आहेत.राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट "ख्वाडा" ला राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यातील भूमिकेचा गौरव म्हणून संत रोहिदास संस्था आडगांवच्या विद्यमाने संत रोहिदास महाराज जयंतीचे औचित्य साधून 16/3/2016 रोजी ह.भ.प. अर्जुन महाराज खाडे आळंदीकर यांचे शुभहस्ते आडगांव येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या निवडीचे संजय खामकर, न नितीन उदमले, तुकाराम शेंडे, एकनाथ राऊत, नंदकुमार विप्रदास, किरण वाकडमाने, अरुण आहेर, मारुती शिंदे, बाबासाहेब कानडे, वाघनाथ साळुंके आदिंनी स्वागत केले आहे.










